मुंबई पोलिसांची कंदील उडवण्यावर बंदी, विनाकारण पाच जणांना एकत्र येण्यास बंदी


मुंबई: मुंबई पोलिसांचे डीसीपी ऑपरेशन संजय लाटकर यांनी 16 ऑक्टोबर 2022 ते 14 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुंबईत कंदील उडवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. हा आदेश जारी करत असामाजिक तत्व याचा फायदा घेऊन मुंबईत कोणतेही अनुचित काम करू शकतात, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळेच आता कंदील विकणे, ते ठेवणे आणि उडवणे यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे पालन न केल्याने मुंबई पोलिस त्यांच्यावर भादंवि कलम 188 अन्वये कारवाई करणार आहेत.

यासोबतच मुंबई पोलिसांनी शहरात 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना (योग्य कारणाशिवाय) एकत्र येण्यास बंदी घातली आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, मुंबईतील शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांना वेगवेगळ्या स्त्रोतांकडून मिळाली आहे. याशिवाय मानवी जीवित व मालमत्तेचे नुकसानही होऊ शकते. त्यामुळे मुंबईत दंगल घडू नये आणि सार्वजनिक वित्तहानी किंवा जीवितहानी होऊ नये, यासाठी 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचा हा आदेश 16 ऑक्टोबर 2022 ते 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत लागू राहणार आहे.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ‘डी’ कंपनीशी संबंधित पाच जणांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. त्यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. यापूर्वी खंडणीच्या प्रकरणात गुंड छोटा शकीलचा मेहुणा, सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि व्यापारी रियाझ भाटी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला.