आला इंफिनिक्सचा पहिला बजेट फाईव्ह जी फोन हॉट २०

इंफिनिक्सने त्यांचा पहिला फाईव्ह जी स्मार्टफोन हॉट २० नावाने बाजारात आणला असून हा बजेट स्मार्टफोन आहे. कमी किमतीत सुद्धा अनेक चांगली फीचर्स या फोनसाठी दिली गेली आहेत. ब्लॅक, स्पेस ब्ल्यू, ब्लास्टर ग्रीन अश्या तीन रंगात ग्राहकांना निवड करता येणार आहे. या फोनसाठी ७ जीबी रॅम दिली गेली असून त्यात ४ जीबी रॅम आणि ३ जीबी व्हर्च्युअल रॅम आहे. फोन साठी १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिले गेले आहे. युरोपीय बाजारात या फोनची किंमत १७९ युरो म्हणजे १४४२५ रुपये आहे.

या फोनला ६.६ इंची आयपीएस एलएलडी पॅनल दिले गेले आहे आणि अँड्राईड १२ ओ एस आहे. साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असून १८ डब्ल्यू चार्जिंग सपोर्ट करणारी ५००० एमएएच बॅटरी आहे. ही बॅटरी ५ डब्ल्यू रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करते. ड्युअल सिम, युएसबी सी पोर्ट आहे. फोनसाठी ५० एमपी सॅमसंग डेप्थ सेन्सर, ८ एमपी फ्रंट फेसिंग स्नॅपर कॅमेरा दिला गेला आहे. सुपर नाईट मोड, सुपर नाईट फिल्टर, पोर्ट्रेट मोड, शॉर्ट व्हीडीओ मोड, आय ट्रॅकिंग अशी फोटोग्राफी साठी खास फीचर्स दिली गेली आहेत.