अखेर आनंद महिन्द्रांना मिळाली ‘स्कोर्पिओ एन’ ची डिलिव्हरी

महिंद्र अँड महिंद्रचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांना अखेर दीर्घ प्रतिक्षेनंतर स्कोर्पिओ एन या नव्या कारची डिलिव्हरी मिळाली आहे. याचाच अर्थ महिंद्र यांच्या घरी नवी गाडी दाखल झाली आहे. सोशल मिडीयावर हटके पोस्ट टाकून नेहमीच चर्चेत राहणारे आनंद महिंद्र  त्यांच्या या नव्या पोस्ट मुळे पुन्हा नव्याने चर्चेत आले आहेत.

महिंद्रच्या या नव्या स्कोर्पिओसाठी प्रचंड मोठी प्रतीक्षा यादी आहे. आनंद या संदर्भात म्हणतात, ‘मी सुद्धा या नव्या गाडीच्या प्रतीक्षेत होतो. आज डिलिव्हरी मिळाली. माझ्यासाठी हा मोठा दिवस आहे. मला स्कोर्पिओ एन मिळाली. आता तिच्यासाठी छान नाव हवे आहे. तुमच्या या संदर्भातील सल्ल्याचे स्वागत आहे..’

महिंद्र यांच्या या ट्वीट वर प्रतिक्रियांचा पाउस पडला असून अनेकांनी त्यांना कार साठी नावे सुचविली आहेत. ग्राहकांच्या मध्ये सुद्धा नव्या स्कोर्पिओ एन बद्दल उत्सुकता आहे. या वाहनाचे काही दिवसांपूर्वी केवळ अर्ध्या तासात १ लाख युनिट बुकिंग झाले आहे. मात्र या वर्षात फक्त २५ हजार ग्राहकांनाच ही गाडी मिळू शकणार आहे. या गाडीसाठीची प्रतीक्षा आता दोन वर्षांवर गेली असून २६ सप्टेंबर पासून नव्या स्कोर्पिओची डिलिव्हरी सुरु झाली आहे.