‘हनुमान’नंतर ‘रावण’च्या पात्राचा मृत्यू, रामलीलादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


अयोध्या : उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रामलीलाच्या रंगमंचावर भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. फतेहपूरमधील हनुमानाची भूमिका करणाऱ्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला. त्यानंतर एका दिवसानंतर अयोध्येत रावणाची भूमिका करणाऱ्या कलाकाराच्या मृत्यूने खळबळ उडाली.

अयोध्येतील अयहार गावात रविवारी रात्री रामलीला सुरू होती. 60 वर्षीय पतिराम येथे रावणाची भूमिका करत होते. सीता हरण दृश्यादरम्यान त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. कोणी काही करण्याआधीच ते पडले. रामलीला तात्काळ थांबवण्यात आली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

गावप्रमुख पुनीत साहू यांनी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना सांगितले की, पतीराम गेल्या अनेक वर्षांपासून रावणाची भूमिका करत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी देवमती व दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. एका मुलीचे लग्न झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच शोककळा पसरली.

अशीच एक घटना फतेहपूरच्या धाटा पोलीस स्टेशन हद्दीतील सलेमपूर गावात घडली. मंडपामध्ये कलाकार रामकथेचे आयोजन करत होते. यामध्ये लंका दहनाची प्रक्रिया चालू होती. त्यानंतर रंगमंचावर हनुमानाची भूमिका साकारत असताना अचानक रंगमंचावरून खाली पडून कलाकाराचा मृत्यू झाला. स्टेज आर्टिस्ट खाली पडताच लोकांनी धावत जाऊन त्याला उचलले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

सलेमपूर गावात राहणारा रामसरूप (52) हनुमानाची भूमिका करत असताना सिंहासनावरून खाली पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नाथूचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतक परिसरात फेरीवाले करून वस्तू विकून उदरनिर्वाह करत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. देवी जागरण निमित्त दरवर्षीप्रमाणे यावेळीही लोकांच्या मनोरंजनासाठी हनुमानाची भूमिका मांडण्यात आली होती. तेव्हा ही दुःखद घटना घडली. धाटा एसएचओ प्रवीण सिंह यांनी सांगितले की, हा अपघात सलेमपूर गावात नवदुर्गा जागरणमध्ये झाला.