
क्रिस गेलच्या झोकदार गरब्यावर चाहते खुश
गुजराथ जायंट्स टीम मधील सर्व खेळाडूंनी गुजराथ मध्ये नवरात्री गरब्याचा आनंद लुटला असून वेस्ट इंडीजचा स्टार खेळाडू क्रिस गेल याच्या गरबा नृत्याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला खूप लाईकस मिळाले आहेत.
गेलचे चाहते त्यांच्या खेळाबरोबरच त्याच्या आयुष्य जगण्याच्या स्टाईल वर सुद्धा फिदा आहेत. गेल सध्या लीजंटस लीग मध्ये गुजराथ जायंटस टीम मध्ये खेळत आहे. या टीमचा कप्तान वीरेंद्र सहवाग असून प्ले ऑफ साठी त्यांनी क्वालिफाय केले आहे. सोमवारी ही टीम एलीमिनेटर सामना खेळणार आहे. त्यापूर्वी संघातील खेळाडूंनी गरबा एन्जॉय केला.
सेहवाग आणि गेल सह अन्य खेळाडू खास गरबा विशेष पोशाख घालून या नृत्यात सामील झाले मात्र गेलच्या गरबा स्टाईल ने सर्व अवाक झाले असे समजते. ट्वीटर वर गेलच्या या नृत्याचा व्हीडीओ शेअर केला गेला आहे.
