Drishyam 2 First Look : अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ चा फर्स्ट लूक रिलीज, विजय साळगावकर परतले कुटुंबासह


दृष्यम 2 चा अधिकृत फर्स्ट लूक निर्मात्यांनी सोशल मीडियावर रिलीज केला आहे. अजय देवगण पुन्हा एकदा ‘दृश्यम’च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट मल्याळमचा हिंदी रिमेक आहे, ज्यामध्ये सुपरस्टार मोहनलाल दिसला होता.

एक छोटीशी गोष्ट सांगतो. दिवस होता २ ऑक्टोबर. विजय साळगावकर हे आपल्या कुटुंबासह पणजीतील स्वामी चिन्मयानंदांच्या सत्संगाला गेले होते. तेथे त्यांनी हॉटेलमध्ये पावभाजी खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी 3 ऑक्टोबर रोजी संपूर्ण कुटुंब घरी परतले. ही कथा ऐकून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण अजय देवगणच्या दृष्यमबद्दल बोलत आहोत. होय, अजय देवगण पुन्हा एकदा या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येत आहे, ज्याचा फर्स्ट लूकही त्याने रिलीज केला आहे. दृष्यम 2 चा अधिकृत फर्स्ट लूक निर्मात्यांनी सोशल मीडियावर रिलीज केला आहे.


या कथेची आठवण करून देत अजय देवगणने ‘दृश्यम 2’चे पोस्टर शेअर केले आहे. त्याने सांगितले की त्याचा टीझर (दृश्यम 2 टीझर) उद्या म्हणजेच शुक्रवारी रिलीज होणार आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्याने लिहिले, 2 आणि 3 ऑक्टोबरला काय घडले ते लक्षात ठेवा, नाही का? विजय साळगावकर पुन्हा एकदा कुटुंबासह परतले आहेत.


अजय देवगणची पोस्ट
या फोटोमध्ये अजय देवगणची पत्नी श्रिया शरण आणि दोन्ही मुली दिसत आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप कोणाचाही चेहरा दाखवलेला नाही. एक दिवसापूर्वीच या अभिनेत्याने चित्रपटाच्या कथेत दाखवलेले महत्त्वाचे पुरावे सांगून प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथेची आठवण करून दिली होती. या चित्रपटात तब्बूही मुख्य भूमिकेत आहे.

मोहनलाल यांचा दृश्यम
अजय देवगणचा ‘दृश्यम’ हा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला होता, ज्याचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. यात अजय देवगण, तब्बू, श्रिया शरण, इशिता दत्ता, रजत कपूर आणि मृणाल जाधव यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट 2013 च्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक होता, ज्यामध्ये सुपरस्टार मोहनलाल दिसला होता. साऊथचा ‘दृश्यम 2’हा गेल्या वर्षी रिलीज झाला होता.