पुण्यात पीएफआयच्या समर्थनार्थ ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा! या छाप्याविरोधात कार्यकर्ते करत होते निदर्शने


पुणे : पुणे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. एनआयए, ईडी-सीबीआय आणि पोलिसांनी त्यांच्या संस्थेविरुद्ध नुकत्याच टाकलेल्या छाप्यांविरोधात पीएफआय कॅडर एकत्र आले होते. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नंतर त्यांना अटक करण्यात आली.

देशभरात पीएफआयवर झालेल्या कारवाईनंतर पीएफआय कार्यकर्त्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. हे आंदोलन 23 सप्टेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी दुपारी 3 वाजता करण्यात आले.

पीएफआयच्या समर्थनार्थ पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा?
देशभरातील छाप्यांविरोधात पीएफआयचे कर्मचारी काल पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमले होते, त्यादरम्यान पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

पोलिस विभागाने अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पुणे पोलिसांनी सांगितले की, पीएफआयवर एनआयएच्या छाप्याबाबत काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केल्याबद्दल पुणे शहरातील रियाझ सय्यद नावाच्या व्यक्तीसह 60-70 पीएफआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासली जाईल व्हिडिओची सत्यता
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, हा व्हिडिओ पुण्याच्या नावाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सत्यता तपासण्यात येत आहे. हा व्हिडीओ कुठचा आणि कोणी व्हायरल केला? व्हिडिओमधील आवाज एडिट केले आहेत की नाही, याचाही तपास सुरू आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर अनेक राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) नावाच्या इस्लामिक दहशतवादी संघटनेच्या विरोधात छापे टाकण्यात आले आहेत.