काय तो सामना…! 3 षटकांमध्येच उरकला खेळ, या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्याचे स्कोअरकार्ड एकदा पहाच


आंतरराष्ट्रीय सामना फक्त 20 चेंडूत संपला किंवा 3.2 षटकात संपला कोणी म्हटले, तर ते फारच हास्यास्पद ठरेल. पण असे झाले आहे. प्रथम फलंदाजी करताना एक संघ 48 धावांवर बाद झाला, प्रत्युत्तरात दुसऱ्या संघाने अवघ्या 3.2 षटकांत सामना संपवला. विशेष म्हणजे, त्यांनी 100 चेंडू राखून सामना जिंकला आणि आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये असे चौथ्यांदा घडले.

बरं, हा सामना कोणाकोणादरम्यान झाला, ते आम्ही तुम्हाला सांगतो. वास्तविक, हा सामना केनिया आणि कॅमेरून यांच्यात खेळला गेला होता. मे मध्ये, केनियाने विलोमूर पार्क, बेनोनी येथे खेळल्या गेलेल्या T20I सामन्यात कॅमेरूनचा 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कॅमेरूनने 14.2 षटकांत 10 गडी गमावून 48 धावा केल्या. केनियातर्फे यश तलाटीने 8 धावांत 3 बळी घेतले, तर शेम नोचेने 10 धावांत 3 बळी घेतले. लुकासने 2 आणि जेरार्डने एक विकेट घेतली.

प्रत्युत्तरात 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केनियाच्या संघाने 3.2 षटकांत 1 गडी गमावून 50 धावा केल्या. रुषभ पटेलने 14 धावा केल्या, तर सुखदीप सिंगने 10 चेंडूत नाबाद 26 आणि नेहेमियाने नाबाद 7 धावा केल्या. अशाप्रकारे केनियाने 3.2 षटकांत सामना जिंकला.

चौथ्यांदा असे घडले
सर्वाधिक चेंडू शिल्लक असताना विजयांच्या बाबतीत ते चौथ्या स्थानावर आहे. विश्वविक्रम ऑस्ट्रियाच्या नावावर आहे, ज्याने 2019 मध्ये तुर्कीविरुद्ध 104 चेंडू राखून 10 गडी राखून विजय मिळवला होता. ओमान दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी फिलिपाइन्सविरुद्धचा सामना 103 चेंडूत 9 गडी राखून जिंकला. लक्झेंबर्गने तुर्कीवर 101 चेंडूत 8 विकेट्स राखून विजय मिळवला.