महाभारत : 700 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये तयार होणार ‘महाभारत’, दिसणार अक्षय कुमारपासून रणवीर सिंगपर्यंत!


अॅक्शन, ड्रामा, रोमान्स आणि थ्रिलनंतर बॉलिवूड आता पौराणिक कथांकडे वळत आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर ‘महाभारत’वर चित्रपट बनणार आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या D23 एक्स्पोमध्ये त्यावर चित्रपट बनवण्याची घोषणाही करण्यात आली होती. कौरव आणि पांडवांच्या कथेवर आधारित ‘महाभारत’ पहिल्यांदाच बीआर चोप्रा यांनी छोट्या पडद्यावर आणला होता. आता दिग्दर्शक फिरोज नाडियादवाला यावर चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटात बॉलीवूडचे अनेक कलाकार दिसणार आहेत, त्याचप्रमाणे त्याचे बजेट ऐकून तुमचेही होश उडाले असतील.

फिरोज नाडियादवाला यांनी हेरा फेरी आणि वेलकम सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिरोजने या चित्रपटावर काम सुरू केले आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू असल्याचे बोलले जात आहे. तथापि, चित्रपटाच्या पूर्वनिर्मितीला आणखी काही वर्षे लागतील आणि महाभारत साधारण 2025 मध्ये तयार होईल. हा चित्रपट हिंदीत बनवला जाणार असला, तरी इतर भाषांमध्येही तो डब केला जाणार आहे.

फिरोज नाडियाडवाला म्हणतात की त्यांचा महाभारत हा चित्रपट हॉलिवूडच्या लॉर्ड ऑफ रिंग्ज, गेम ऑफ थ्रोन्स, स्टार वॉर्स, हॅरी पोर्टर यांना टक्कर देईल. तीन तासांच्या या चित्रपटाचे बजेट जवळपास 700 कोटी रुपये आहे. असे झाल्यास भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा बजेट चित्रपट ठरेल.

आता महाभारताच्या स्टारकास्टबद्दल बोलूया. या चित्रपटात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग, परेश रावल, नाना पाटेकर, अनिल कपूर आदी कलाकार झळकणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये कोणाचे पात्र काय असेल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटात साऊथमधील टॉपचे कलाकारही भूमिका साकारताना दिसणार आहेत.