Ponniyin Selvan 1 चा दमदार ट्रेलर रिलीज


तामिळ सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन यांनी मंगळवारी चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन 1’ चा दमदार ट्रेलर रिलीज केला. हा चित्रपट लेखक कल्की यांच्या कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट भारतातील सर्वात महान साम्राज्य चोलांची कथा सांगणारा असेल. तीन मिनिटे 23 सेकंदांचा हिंदी ट्रेलर खूपच प्रेक्षणीय आहे. या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप आशा आहेत.

3 मिनिट 30 सेकंदाच्या तमिळ ट्रेलरची सुरूवात कमल हासनने चित्रपटाच्या ऑफरबद्दल स्पष्टीकरण देऊन केली आहे. ट्रेलरमध्ये साऊथसोबतच काही बॉलीवूड स्टार्सही दिसले आहेत णि चित्रपटाचे डायलॉग्सही खूप छान कथानक आहेत

सिनेमॅटोग्राफर रविवर्मन यांच्या काही नेत्रदीपक व्हिज्युअल्सची झलक देखील आपल्या पाहायला मिळते, असे कमल हासन म्हणतात. ट्रेलरमध्ये आदित्य करिकलनच्या भूमिकेत विक्रम आणि नंतर अरुण मोजी वर्मनच्या भूमिकेत जयम रवीची ओळख करून देत आहे, जो नंतर प्रख्यात राजा राजा चोलन बनतो.

पुढील कार्तीची ओळख वल्लवरायण वंथीयेवन म्हणून केली जाते. ट्रेलरमध्ये असे लोक आहेत की ज्यांना सिंहासन बळकावायचे आहे याची झलक मिळते. दरम्यान, ट्रेलरमध्ये हे देखील दिसून येते की अरुण मोजी वर्मनचा तंजावरमध्ये पाय ठेवण्याचा कोणताही हेतू नाही.

ट्रेलर प्रेक्षकांना ‘पोनियिन सेल्वन’ मधील सर्वात महत्त्वाच्या पात्रांपैकी एक, नंदिनीची ओळख करून देतो. हे पात्र ऐश्वर्या राय बच्चनने साकारले आहे. ट्रेलरमध्ये नंदिनी आदित्य करिकलन आणि अरुणमोजी वर्मन यांना सैन्यात भरती होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नेत्रदीपक ट्रेलरने चित्रपटाकडून अपेक्षा वाढवल्या आहेत, ज्याचा पहिला भाग 30 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.