T20I Rankings : बाबर आझमकडून सूर्यकुमार यादव हिसकावू शकतो नंबर 1चा मुकुट, या आशिया कपमध्ये होऊ शकतो उलटफेर


पाकिस्तानचा सलामीवीर आणि कर्णधार बाबर आझम बऱ्याच काळापासून T-20 फलंदाजांच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. मात्र आता त्यांची जागा धोक्यात आली आहे. त्याला टीम इंडियाचा तगडा फलंदाज सूर्यकुमार यादवकडून कडवी टक्कर मिळत आहे. आशिया चषक 2022 दरम्यान सूर्यकुमार बाबर आझमकडून नंबर 1 टी-20 फलंदाजाचा मुकुट हिसकावून घेऊ शकतो.

बाबर आझम 818 गुणांसह T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल फलंदाज आहे. येथे त्याचा सहकारी मोहम्मद रिझवान (796) दुसऱ्या स्थानावर आणि सूर्यकुमार यादव (792) तिसऱ्या स्थानावर आहे. म्हणजेच बाबर आणि सूर्या यांच्यात केवळ 24 गुणांचे अंतर आहे. हे खूप लहान अंतर आहे, जे दोन किंवा तीन चांगल्या डावात भरून काढता येऊ शकते.

आशिया कप 2022 मध्ये टीम इंडिया सुपर-4 टप्प्यात तीन सामने खेळणार आहे. यानंतर त्यांनी अंतिम फेरी गाठली, तर सूर्यकुमारला चौथा सामनाही खेळण्याची संधी मिळेल. जर सूर्याने या चार सामन्यांमध्ये दोन-तीन दमदार खेळी खेळल्या, तर तो टी-20चा नंबर 1 फलंदाज बनेल. होय, यासाठी बाबर आणि रिझवान या स्पर्धेत जास्त चांगली कामगिरी करू शकणार नाहीत, हे देखील आवश्यक असेल.

असा सूर्यकुमार यादवचा आहे T-20I विक्रम
सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी मार्च 2021 मध्ये T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो 25 सामने खेळला आहे. या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहा अर्धशतके आणि एका शतकाच्या मदतीने 758 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 39.89 आणि स्ट्राइक रेट 177.51 होता. आशिया चषकातील शेवटच्या सामन्यात त्याने 26 चेंडूत 68 धावांची जलद खेळी खेळली होती.