मोहम्मद हाफिजचे रोहित शर्माबाबत बेताल वक्तव्य, चाहत्यांनी घेतली शाळा


पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार सलामीवीर मोहम्मद हाफीजने भारतीय कर्णधार रोहित शर्माबद्दल बेताल वक्तव्य केले आहे. त्याने रोहित शर्माला ‘कन्फ्युज्ड पर्सनॅलिटी’ म्हटले. याशिवाय हाँगकाँगविरुद्ध भारताला पराभवाची भीती वाटत असल्याचेही त्याने सांगितले. मात्र, भारतीय चाहत्यांना हाफिजचे हे विधान आवडले नाही आणि त्यांनी त्याची शाळा घेतली.

भारत आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्यानंतर हाफिजने रोहित शर्माबाबत बेताल वक्तव्य केले. त्याच्या या बेताल वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे. वास्तविक, हाफिजने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.


व्हिडिओमध्ये हाफिज भारतीय कर्णधार रोहित शर्माला गोंधळलेले व्यक्तिमत्व सांगत आहे. तो म्हणतो की तो जे बोलत आहेत, ते प्रतिबिंबित होत नाही. आम्ही भारतासाठी हे करत आहोत, आम्हाला तसे खेळायचे आहे, ते होत नाही, असे त्याचे विधान होते, तरीही मी जे बोललो ते असे की खेळपट्टी चांगली दिसत आहे, आम्हाला त्यावर फलंदाजी करायला हरकत नाही, पण आम्हाला गोलंदाजी करायची होती. म्हणजेच हाँगकाँगविरुद्ध पराभवाची भीती वाटते. माझ्या मते हे चांगले माइंड सेट नाही. तसे असेल तर शुभेच्छा.

हाफिजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भारतीय चाहत्यांनी त्याला जोरदार फटकारले. या व्हिडिओवर रोहितचे चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत आणि हाफिजला खूप काही सुनवत आहेत.