9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांचा बलात्कार, तीन आरोपींपैकी 2 आरोपींना अटक, एक फरार


मुंबई : देशात मुली आणि महिलांच्या सुरक्षेचे लाखो दावे केले जातात, पण सत्य हे आहे की सगळे कायदे करूनही मुली आणि महिला सुरक्षित नाहीत. दररोज महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत. ताजे प्रकरण देशाची आर्थिक राजधानी मुंबईचे आहे. येथे एका 9 वर्षांच्या मुलीला तीन नराधमांनी आपल्या वासनेची शिकार बनवले आहे. ही लाजीरवाणी घटना मुंबईतील भांडुप भागातील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचवेळी पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींचे वय 62 वर्षे आणि 65 वर्षे आहे.

पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 2020 ते 22 जून 2022 दरम्यान घडली, जेव्हा अल्पवयीन पीडितेने ही माहिती तिच्या आईला दिली होती. अल्पवयीन पीडितेकडून सर्व काही जाणून घेतल्याने 44 वर्षीय आईच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर तिने मुलीवर अत्याचाराची तक्रार घेऊन पोलिसात पोहोचली.

पीडितेच्या आईच्या तक्रारीच्या आधारे भांडुप पोलिसांनी तीन जणांविरुद्ध कलम 376, 376 (एबी), 376(2)(एन) आणि पोक्सो कलम 4,6,8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस फरार आरोपींच्या शोधात ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच तिसरा आरोपीही पकडला जाईल.