Cobra Trailer Out : क्रिकेटर इरफान पठाणच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर आऊट, सुरेश रैनाने दिली जबरदस्त प्रतिक्रिया


क्रिकेटच्या मैदानात थैमान घालणारा इरफान पठाण आता अभिनय विश्वात आपली नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. अजय ग्यानमुथू दिग्दर्शित कोब्रा या तमिळ चित्रपटातून इरफान चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात इरफान पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 31 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हातात बंदूक घेऊन दिसला इरफान
ट्रेलरमध्ये इरफान अतिशय दमदार लूकमध्ये बंदूक चालवताना दिसत आहे. खुद्द इरफाननेही त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. इरफानने 2020 मध्ये त्याच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटात काम करण्याची माहिती देऊन त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते.

सुरेश रैनाने व्यक्त केला आनंद
सुरेश रैनाने इन्स्टाग्रामवर कोब्राचा ट्रेलर शेअर करून आपला आनंद व्यक्त केला आणि लिहिले, भाऊ इरफान पठाण तुम्हाला कोब्रामध्ये परफॉर्म करताना पाहून खूप आनंद झाला, हा चित्रपट अॅक्शनने भरलेला दिसत आहे. चित्रपटाच्या यशाबद्दल मी तुमचे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. आता तो पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.

तमिळ सुपरस्टार चियान विक्रम मुख्य भूमिकेत
तुम्हाला सांगतो की, इरफानसोबत या चित्रपटात तमिळ सिनेमाचा सुपरस्टार चियान विक्रम मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात चियान विक्रम एका गणितज्ञाची भूमिका साकारत आहे, ज्याने गणितात प्रभुत्व मिळवले आहे. चित्रपटाचे संगीत प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांनी दिले आहे.

श्रीनिधी शेट्टी देखील दिसणार
कोब्रामध्ये चियान विक्रम व्यतिरिक्त श्रीनिधी शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय मिया जॉर्ज, रोशन मॅथ्यू, सरजानो खालिद, पद्मप्रिया, मोहम्मद अली बेग, कनिह, मिरनालिनी रवी, मीनाक्षी आणि के.एस. रविकुमारही या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसणार आहे.