मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार टी. राजा यांना अटक, हैदराबादमध्ये जोरदार निदर्शने


तेलंगणा: हैदराबादमध्ये मोहम्मद पैगंबर यांच्यावर टीका करणारे तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा यांना हैदराबाद शहर टास्कफोर्स आणि शाहिनयथगंज पोलिसांनी अटक केली आहे. तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर हे प्रकरण तापले आहे. त्यांच्या वक्तव्याविरोधात हैदराबादमध्ये काल सायंकाळपासून निदर्शने सुरू आहेत. टी. राजा यांच्यावर पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांच्या विरोधात जारी केलेल्या वक्तव्यात पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त टिप्पणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

राजाविरुद्ध नोंदवला एफआयआर
माहिती देताना हैदराबाद दक्षिण विभागाचे डीसीपी पी साई चैतन्य यांनी सांगितले की, आमदार राजा सिंह यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राजा यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काल रात्री दक्षिण झोन डीसीपी कार्यालयात निदर्शने सुरू झाली होती.

मुनव्वर फारुकीच्या शोवरुन गदारोळ
भाजप आमदार टी राजा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संतप्त झालेल्या लोकांनी हैदराबादच्या डबीरपुरा भवानी नगरमध्ये निदर्शने केली. निदर्शने करणाऱ्यांमध्ये एआयएमआयएमचे नेतेही होते. त्याचवेळी हैदराबादच्या अनेक भागात लोकांनी टी राजाविरोधात निदर्शने केली. भाजप आमदार टी राजा सिंह हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. टी राजा सिंह हे तेलंगणातील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. वास्तविक, स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांनी हैदराबादमध्ये एक शो केला होता, परंतु टी राजाने शोच्या आधी सांगितले होते की ते हैदराबादमध्ये त्यांचा शो होऊ देणार नाहीत.

टी राजा यांनी सोशल मीडियावर जारी केला व्हिडिओ
त्याचवेळी, राजा सिंह यांनी शोच्या आधी सांगितले होते की, तेलंगणा सरकार आणि हैदराबाद पोलिस जर मुनव्वर फारुकीच्या शोला परवानगी देतील, तर ते वादग्रस्त वक्तव्य करतील. राजा सिंह यांनी आरोप केला आहे की मुनव्वर फारुकी आपल्या शोमध्ये हिंदू देव-देवतांवर कथित वादग्रस्त टिप्पणी करतात. यामुळेच त्यांनी पैगंबरांविरोधात वादग्रस्त बोलले आहे. राजा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करून एक गाजलेली गोष्ट सांगितली आहे. त्यामुळे काल रात्री संपूर्ण हैदराबाद शहरातील विविध भागात लोकांनी निदर्शने केली.