टीक-टॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन


टीक-टॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भारतीय जनता पक्षाने (भाजप) तिला हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, पण ती निवडणूक हरली. सोनालीसमोर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई हे उमेदवार होते. भाजपच्या हरियाणा युनिटनेही त्यांची महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. सोनालीचे पती संजय फोगट यांचेही 2016 मध्ये निधन झाले.

सोनालीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सोनाली फोगटने सोमवारी रात्रीच इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केली होती. टीक-टॉकसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध असलेल्या सोनालीने बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या 14 व्या हंगामात भाग घेतला होता.

सोनाली फोगट दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात जून महिन्यात प्रसिद्धीच्या झोतात आली होती, जेव्हा तिने एका मंडी कामगाराला मारहाण केली होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला होता. व्हिडिओमध्ये ती हिस्सार बाजार समितीचे सचिव सुलतान सिंग यांना मारहाण करताना दिसत होती.