जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ करोनाग्रस्त

जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ किशिदा यांना करोना संसर्ग झाला आहे. त्यांचा कोविड चाचणी अहवाल सकारात्मक आला असून ते विलगीकरणात असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगितले गेले आहे. फ़ुमिओ यांच्या मध्ये करोनाची लक्षणे सौम्य आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, फ़ुमिओ यांना,’ लवकर बरे व्हा’ असा संदेश ट्वीट करून दिला आहे.

जपानच्या स्थानिक मिडियानुसार पंतप्रधान फ़ुमिओ यांना शनिवारी रात्री थोडा ताप आणि खोकला आला. त्यानंतर त्यांची करोना चाचणी केली गेली. ६५ वर्षीय फ़ुमिओ कुटुंबांसह १ आठवडा उन्हाळ्याच्या सुट्टीवर गेले होते आणि सोमवारी ते कार्यालयात परतणार होते.

जपान मध्ये पुन्हा करोना केसेस वाढत चालल्या असून शनिवारी देशात २,५३,२६५ संक्रमित आढळले. देशात अडीच लाखांपेक्षा जास्त संक्रमित आढळण्याचा हा सलग तिसरा दिवस आहे. टोक्यो मध्ये एका दिवसात २५२७७ नवीन केसेस आल्या आहेत. ओसाका आणि अन्य शहरात सुद्धा करोना संक्रमित संख्या वाढली आहे.