मच गया शोर… मुंबई पोलिसांचा जन्माष्टमीचा उत्सव, व्हिडिओला लोकांकडून मिळत आहे पसंती


मुंबई पोलिसांच्या खाकी बँडने जन्माष्टमीनिमित्त एक जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून तुमची दहीहंडी आनंदात जाईल. या काही सेकंदांच्या व्हायरल क्लिपमध्ये, खाकी स्टुडिओचे सदस्य अमिताभ बच्चन यांच्या ‘मच गया शोर सारी नगरी’ या चित्रपटातील सॅक्सोफोन, ट्रम्पेट, बासरी आणि इतर वाद्यांसह गाणे वाजवताना दिसत आहेत. यामुळेच हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप पाहिला जात आहे.


मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले – खाकी स्टुडिओ थांबणार नाही! मुंबई पोलिस खाकी स्टुडिओमध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘मच गया शोर’सोबत कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. हे गाणे अमिताभ बच्चन आणि परवीन बाबी यांच्या ‘खुद्दार’ (1982) चित्रपटातील आहे, जे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायले आहे.