Dance Ka Bhoot Teaser : रणबीर कपूरवर डान्सचे भूत, पहा ‘ब्रह्मास्त्र’च्या नव्या गाण्याचा जबरदस्त टीझर


‘ब्रह्मास्त्र’ची रिलीज डेट जसजशी जवळ येत आहे, तसतसे निर्माते चित्रपटाशी संबंधित गोष्टी बातम्यांमध्ये ठेवत आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ मधील केसरिया आणि देवा-देवा ही दोन गाणी रिलीज झाली. सध्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या आणखी एका गाण्याचा टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये अभिनेता रणबीर कपूर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हे संपूर्ण गाणे देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.


टीझरमध्ये दिसत आहे दसऱ्याची झलक
ब्रह्मास्त्र हा चित्रपट पौराणिक कथांना आधुनिकतेची जोड देऊन तयार करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जिथे रणबीर कपूर देवा-देवा गाण्यात दैवी शक्तींचा शोध घेताना दिसला आणि हे गाणे भगवान शिवावर आधारित आहे. आता दसऱ्याचा सण डान्स भूतमध्ये दाखवला आहे. टीझरच्या सुरुवातीला रणबीर कपूर मंडपामध्ये प्रवेश करताना बेल वाजवताना दिसत आहे. यानंतर तो ग्रुपमधील लोकांसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. निर्माता अयान मुखर्जीशिवाय या गाण्याचा टीझर आलिया भट्टनेही तिच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.

या दिवशी रिलीज होईल ब्रह्मास्त्र
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील आतापर्यंत दोन गाणी रिलीज झाली असून डान्स का भूत हे तिसरे गाणे आहे. सध्या त्याचा टीझर चाहत्यांना खूप आवडला आहे आणि आता लोक या संपूर्ण गाण्याच्या रिलीजची वाट पाहत आहेत. ब्रह्मास्त्रबद्दल बोलायचे झाले, तर अयान मुखर्जी निर्मित या चित्रपटात रणबीर कपूर (शिवा) आणि आलिया भट्ट (ईशा) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय मेगास्टार अमिताभ बच्चन, दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन आणि अभिनेत्री मौनी रॉय हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. निर्मात्यांनी ‘ब्रह्मास्त्र’ची रिलीज डेट 9 सप्टेंबर 2022 निश्चित केली आहे. जवळपास दहा वर्षांच्या मेहनती आणि मेगा बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.