Dahi Handi 2022 : गोविंदाचा मृत्यू झाल्यास 10 लाख, तर जखमींना 5 लाखांची भरपाई… दही-हंडीदरम्यान महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा


मुंबई : जन्माष्टमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र सरकारने दहीहंडी उत्सवासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. दहीहंडीदरम्यान गोविंदाचा मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबाला 10 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. त्याचबरोबर उत्सवादरम्यान गोविंदा जखमी झाल्यास 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. याशिवाय गोविंदा पथकांचा समूह विमाही काढण्यात आला आहे. याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत केली. दरवर्षी जन्माष्टमीच्या दिवशी दही-हंडीदरम्यान गोविंदांसोबत अपघात झाल्याच्या बातम्या येत असतात.

महाराष्ट्र विधानसभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दही-हंडीदरम्यान गोविंदाचा मृत्यू झाल्यास पीडितेच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. कोणताही गोविंदा गंभीर जखमी झाल्यास त्याला 5 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. याशिवाय गोविंदा पथकांचा समूह विमा काढण्यात आला आहे.

दोन वर्षांनंतर साजरी होत आहे दहीहंडी
महाराष्ट्रातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या दहीहंडीची यावेळी खूप उत्सुकता आहे. खरंतर कोरोनामुळे 2 वर्षांपासून दहीहंडी आयोजित करण्यात आली नव्हती. महाराष्ट्रात दही-हंडीच्या वेळी मडके फोडणाऱ्या संघाला लाखोंचे बक्षीस दिले जाते. दही-हंडीचा हा सण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोणीने भरलेली हंडी उंचावर टांगली जाते. त्यानंतर गोविंदांचा समूह थर रचून ती हंडी फोडण्याचा प्रयत्न करतो.