‘मेरा भारत महान’. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा व्हिडीओ वेगाने व्हायरल

आजही पूर्ण जग करोनाच्या प्रभावात असतानाच करोना लसीकरण आणि लसीकरण प्रमाणपत्र या संदर्भातील भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल झाला आहे. भारताच्या कोविन पोर्टल संदर्भातील या व्हिडीओने भारताची मान जगात ताठ केली आहे. जयशंकर या व्हिडीओ मध्ये त्यांच्या बाबत घडलेली एक घटना सांगत आहेत. हा व्हिडीओ उद्योजक अरुण पुद्डूर यांनी शेअर केला आहे आणि त्यांनतर नॉर्वेचे राजदूत एरिक सोल्हेम यांनीही शेअर केला आहे.

या व्हीडीओ मध्ये जयशंकर सांगतात कोविड बंदी उठल्यानंतर ते त्यांच्या अमेरीकेत राहणाऱ्या मुलाकडे गेले  होते आणि ते दोघे एका रेस्टॉरंट मध्ये गेले. तेव्हा तेथे त्यांना कोविड लसीकरण सर्टिफिकेट मागितले गेले. जयशंकर यांनी चटकन मोबाईलवरचे प्रमाणपत्र दाखविले पण त्यांच्या मुलाने मात्र पाकिटातून हाताने लिहिलेले प्रमाणपत्र दाखविले. जयशंकर म्हणतात, भारत सरकारच्या कोविड पोर्टल ‘कोविन’ ने नागरिकांचे काम किती सुलभ केले याचा हा पुरावाच होता. जगातील सर्वात आधुनिक देशाच्या म्हणजे अमेरिकेच्या तुलनेत आम्ही अधिक अचूक आणि डिजिटल पद्धतीने करोना ड्राईव्ह चालविण्यात सफल झालो याचा अभिमान वाटला आणि माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण होता. आम्ही नव्या दुनियेत पाउल ठेवले आहे हेच या वरून दिसले.’

कोविन हे भारतीय वेब पोर्टल असून त्याचा वापर भारतीय नागरिकांना करोना लस नोंदणीसाठी करावा लागतो. लसीकरणाचे प्रमाणपत्र येथेच डिजिटली मिळते.