करोना मुक्त झाला किम जोंग उन

उत्तर कोरियाचा सर्वोच्च नेता किम जोंग उन करोना मधून बाहेर आला आहे. किम जोंग उनला करोनाची लागण झाल्याच्या आणि त्यातून तो बरा झाल्याच्या बातम्या त्यामुळे येऊ लागल्या आहेत. किम जोंग उनची बहिण किम यो जोंग हिने एका कार्यक्रमात रडत रडत भाऊ किम जोंगची तब्येत गंभीर असल्याचे सांगितले होते आणि त्यावेळी त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती रडू लागली होती. किम यो ने यावेळी उत्तर कोरियात करोना पसरण्यास दक्षिण कोरिया कारणीभूत असल्याचे आणि त्यांनी फुग्यातुन करोनाचे विषाणू इकडे सोडल्याचे आरोप केले होते. तसेच दक्षिण कोरियाचा बदला घेतला जाईल असेही जाहीर केले होते. १० ऑगस्टच्या सत्ता दलाच्या बैठकीला किम जोंग उन हजर राहिला होता.

योंगने किम जोंग उनला करोना झाल्याचा आणि तो करोना मुक्त झाल्याचा केलेला खुलासा जगाला हैराण करणारा ठरला आहे. कारण आजपर्यंत उत्तर कोरियाच्या सुप्रीम नेत्याच्या आरोग्याबाबत कुठलाच अपडेट कधीच सार्वजनिक केला गेलेला नाही. किम योंगने गुरुवारी कार्यक्रमात बोलताना किम आजारी होता पण त्याच्या मनात सतत जनतेचीच काळजी होती असेही सांगितले होते.

या अगोदर किम जोंग उन याने उत्तर कोरियात करोना एलियन्समुळे आल्याचे वक्तव्य केले होते. तो म्हणाला होता, ‘ दक्षिण कोरियातून एलियन्सने करोना विषाणू भरलेले फुगे उत्तर कोरियात टाकले. दक्षिण कोरियावर कारवाई करण्याची धमकी त्याने दिली होती.