वाराणसी : उत्तर प्रदेश एटीएसने इसिसशी संबंधित एका दहशतवाद्याला आझमगडमधून अटक केली आहे. सबाउद्दीन आझमी असे या दहशतवाद्याचे नाव सांगितले जात आहे. जो आझमगड जिल्ह्यातील मुबारकपूर विधानसभेचा रहिवासी आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त हा दहशतवादी स्फोट घडवण्याची योजना आखत होता. असे सांगण्यात येत आहे की दहशतवादी इसिस भर्ती करणाऱ्याच्या थेट संपर्कात होता आणि दहशतवादी आणि जिहादसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना लक्ष्य करण्याच्या तयारीत होता. यासोबतच दहशतवादी आझमी मुस्लिम तरुणांचे ब्रेनवॉश करायचा.
Independence Day 2022 : ATS ने केला आत्मघाती कटाचा पर्दाफाश, ISIS च्या दहशतवाद्याला आझमगडमधून अटक
दहशतवादी होता AIMIM चा सक्रिय सदस्य
दहशतवादी ISIS च्या टेलिग्राम चॅनल AL SAQR MEDIA च्या टेलिग्राम चॅनलशी जोडला गेल्याचे सांगण्यात येत आहे आणि AIMIM चा देखील सक्रिय सदस्य आहे. आझमी भारतात इसिससारखी इस्लामिक संघटना स्थापन करण्याच्या तयारीत होता. त्याचे मनसुबे उधळून लावताना, उत्तर प्रदेश एटीएसने आझमगढमधून सलाउद्दीनला अटक केली आणि त्याची चौकशी सुरू आहे. सध्या जिल्हा अधिकारी यावर बोलण्यास तयार नाहीत, तर कुटुंबीयही काही बोलत नाहीत.
सलाउद्दीन तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना इसिसशी जोडायचा. सबाउद्दीनच्या फेसबुक तपासात असेही समोर आले आहे की, तो बिलालशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत असे आणि बिलालने त्याला इसिसशी जोडले होते. बिलालने सबाउद्दीनच्या मनात जिहाद आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांवरील कारवाईची बीजे पेरली होती. काश्मीरमधील मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी तो अनेकदा सबाउद्दीनशी चर्चा करत असे.
सोशल मीडियावर आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण घेत असे
बिलालने इसिस सदस्य मुसा उर्फ खट्टाब काश्मिरी याचा मोबाईल नंबर देऊन सबाउद्दीनशी संभाषण सुरू केल्याचे सांगितले जात आहे. मुसाने सबाउद्दीनला सीरियात राहणारा ISIS सदस्य अबू बकर अल-शमीचा मोबाईल नंबर दिला. अबू बकरच्या माध्यमातून सबाउद्दीन इसिसमध्ये भर्ती करणारा आणि मुलतानियाचा रहिवासी अबू उमर याच्याशी जोडला गेला होता. अबू उमर सोशल मीडियाच्या माध्यमातून सबाउद्दीनला हँडग्रेनेड आणि आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण देत असे. यासोबतच सबाउद्दीनने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक लोकांना टार्गेट केले होते आणि त्यांच्या नावावर मेल आयडी आणि फेसबुक अकाउंटही ठेवले होते.