पत्नी दीपिकाच्या पदकामुळे दिनेश कार्तिक खूष

पत्नी दीपिका पल्लीकलने कॉमन वेल्थ गेम्स २०२२ स्क्वाश खेळात केलेल्या कांस्य पदक कमाईमुळे पती दिनेश कार्तिक अतिशय खूष झाला आहे. त्याने अंगठा उचलून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे आणि ट्वीटवर वर, ‘ तुझी मेहनत आणि प्रयत्न यांनी रंग भरल्याचे आणि तुम्हा दोघांच्या यशाबद्दल आनंद आणि अभिमान वाटतो’ असे म्हटले आहे. २०२२ कॉमन वेल्थ गेम्स मध्ये भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी बजावली असतानाच स्क्वाश मध्ये भारताचे स्टार खेळाडू सौरव घोषाल आणि दीपिका पल्लीकल यांनी मिक्स्ड डबल्स मध्ये कास्य पदकाची कमाई केली आहे. त्यांनी या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ओंटेलोक्बन डोना व पिले कॅमसन या जोडीचा २-० ने पराभव केला आहे.

दीपिका आणि सौरव हे दोघेही अनुभवी खेळाडू आहेत आणि त्याचाच फायदा त्यांना या स्पर्धेत झाला आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या याच जोडीने २०१८ कॉमनवेल्थ गेम्स मध्ये दीपिका आणि सौरव यांना हरवून रजत पदकावर समाधान मानणे भाग पाडले होते. त्या पराभवाची परतफेड या पदकाने केली आहे. दीपिका आणि सौरव या जोडीने त्यांच्या स्वतःच्या हिमतीवर देशाला अनेक पदके मिळवून दिली आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दीपिका आणि सौरव यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. स्क्वाश मधले भारताचे हे दुसरे पदक आहे. सौरवने मेन्स सिंगल ब्राँझ या पूर्वी जिंकले होते. दिपिका आणि दिनेश कार्तिक यांचा विवाह २०१५ मध्ये झाला असून हिंदू आणि क्रिश्चन अश्या दोन्ही पद्धतीने हा विवाह झाला आहे