SC-ST Act : सोशल मीडियावर अनुसूचित जाती-जमातींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यास जावे लागेल तुरुंगात, केरळ उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय


कोची – सावधान! सोशल मीडियावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांबद्दल अपमानास्पद किंवा असभ्य टिप्पणी करणे आता भारी पडू शकते. अशा कमेंट केल्यास तुरुंगात जावे लागू शकते.

केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर सुनावणी करताना हा आदेश दिला असल्याचे सांगितले. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, SC/ST प्रवर्गातील कोणत्याही व्यक्तीबद्दल सोशल मीडियावर अपमानास्पद टिप्पणी केल्यास, SC/ST कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात यावी.

या आदेशाने उच्च न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. सोशल मीडियावर अनुसूचित जाती-जमातींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी आरोपींनी जामीन मागितला होता. जामीन अर्ज रद्द करताना, केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे की SC/ST च्या एखाद्या व्यक्तीविरुद्ध ऑनलाइन माध्यमातून केलेली अपमानास्पद टिप्पणी देखील SC/ST कायद्यांतर्गत गुन्हा मानली जाईल.