जर तुमच्यापैकी कोणी स्पाइसजेट स्टॉकमध्ये पैसे गुंतवले असतील, तर गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे. भारतीय विमान कंपनी स्पाईसजेटच्या शेअर्समध्ये आज 10 टक्क्यांची घसरण झाली आहे. काल म्हणजेच बुधवारी, DGCA ने स्पिगेटच्या 50 टक्के फ्लाइटवर 8 आठवड्यांसाठी बंदी घातली आहे, त्यानंतर गुरुवारी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
Spicejet Share Down : डीजीसीएच्या आदेशानंतर स्पाइसजेटचे शेअर्स घसरले; स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर
स्टॉक का पडला?
अलीकडेच स्पाइसजेटच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती, त्यामुळे डीजीसीएने हे पाऊल उचलले आहे. DGCA ने म्हटले आहे की, पुढील आठ आठवडे उन्हाळ्यासाठी मंजूर केलेल्या जास्तीत जास्त 50 टक्के उड्डाणे चालवण्याचा आदेश आहे.
52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले शेअर्स
आज कंपनीचा शेअर बीएसईवर 9.66 टक्क्यांनी घसरून 52 आठवड्यांच्या नीचांकी 34.60 रुपये प्रति शेअरवर पोहोचला आहे. कंपनीच्या समभागात ही घसरण अशा वेळी झाली आहे जेव्हा देशांतर्गत शेअर बाजारात तेजीचा कल आहे आणि 30 शेअर्सचा निर्देशांक BSE सेन्सेक्स 733.21 अंक किंवा 1.31 टक्क्यांनी वाढून 56,549.53 वर पोहोचला आहे.
कंपनीने जारी केले निवेदन
या आठ आठवड्यांत बजेट एअरलाइनवर बारकाईने नजर ठेवली जाईल, असे डीजीसीएने म्हटले होते. कंपनीने गुरुवारी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने व्यक्त केलेल्या चिंतेचे निराकरण केले जाईल.
डीजीसीएने म्हटले आहे की स्पाइसजेट सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह हवाई वाहतूक सेवा स्थापन करण्यात अपयशी ठरली आहे. आदेशात म्हटले आहे की एअरलाइन हे टाळण्यासाठी उपाययोजना करत आहे, परंतु सुरक्षित आणि विश्वासार्ह हवाई सेवेसाठी त्यांचे प्रयत्न चालू ठेवणे आवश्यक आहे.