आरे कॉलनीतील वृक्ष तोडी विरोधात होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी, स्थानिक रहिवासी करत आहेत विरोध


मुंबई: मेट्रो कारशेडसाठी मुंबईतील आरे कॉलनीतील वृक्षतोडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सहमती दर्शवली. वरिष्ठ अधिवक्ता गोपाल शंकरनारायणन यांनी ही बाब नमूद केल्यानंतर न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले. शंकरनारायणन म्हणाले की, यापूर्वी तहकूब करूनही रात्रभर झाडे तोडण्याचे काम सुरू होते.

शंकरनारायणन म्हणाले, आमच्याकडे फोटो आहेत. हे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करेल, तसेच या प्रकरणाला उद्याच्या यादीत टाकू शकतो का?, कारण आठवड्याच्या शेवटी जेसीबी आपले काम सुरु करेल, त्यापूर्वी सुनावणी घेणे आवश्यक आहे, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.

स्थानिक नागरिक विरोध करत आहेत
आरे कॉलनीतील झाडे तोडण्यावर बंदी घालण्यासाठी कायद्याचा विद्यार्थी ऋषभ रंजन याने सरन्यायाधीशांना (CJI) लिहिलेल्या पत्राची सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये स्वतःहून दखल घेतली होती. न्यायालयाने अधिकाऱ्यांना आरे कॉलनीतील अधिक झाडे तोडण्यास मज्जाव केला होता. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यापुढे झाडे तोडली जाणार नसल्याचे सांगितले होते.पर्यावरण कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी वसाहतीतील झाडे तोडण्यास विरोध करत आहेत.