राखी सावंतने वाहतुकीचे नियम बसवले धाब्यावर, पोलिसांनी उचलले हे पाऊल


बॉलीवूडची ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री-डान्सर राखी सावंत दररोज काही ना काही कारनाम्यामुळे चर्चेत असते. राखी अनेकदा तिचे विचित्र व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून आदिल खान दुर्रानीसोबतच्या नात्याबद्दल सतत चर्चेत आहे. दरम्यान, तिने मुंबईच्या रस्त्यावर असे काही केले, ज्यामुळे ती आता अडचणीत सापडली आहे.

नियमांचे उल्लंघन पडले भारी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गर्दीच्या रस्त्यावर रहदारीला अडथळा आणल्याबद्दल राखीला ई-चलन जारी करण्यात आले आहे. राखीवर रहदारीचे नियम मोडून तिची कार रस्त्याच्या मधोमध उभी केल्याचा आरोप आहे, त्यामुळे बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. तिच्या या पब्लिसिटी स्टंटमुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागला. यासंबंधीचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक राखीवर आपला राग व्यक्त करत आहेत.


हा व्हिडिओ समोर येताच अंधेरी लोखंडवाला रेसिडेंट असोसिएशनने अभिनेत्रीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राखीचा व्हिडिओ ट्विट करत असोसिएशनने आपल्या ट्विटर हँडलवरून लिहिले की, हे कसले वागणे आहे. कायद्याच्या दृष्टीने आपण सर्व समान आहोत, असे आम्हाला वाटायचे. अशी वाहतूक कोंडी का करायची? या महिलेवर कारवाई करावी असे वाटत नाही का? चलन कुठे आहे?’

पोलिसांनी कापले चलान
लोकांच्या संतापानंतर पोलिसांनी कारवाई करत वाहन मालकाच्या नावाचे ई-चलान कापले. हे चलान ओशिवरा वाहतूक पोलिसांनी जारी केले आहे. मात्र, हे वाहन राखीच्या नावावर नोंदणीकृत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या ही कार कोणाच्या नावावर आहे याचा खुलासा करण्यात आलेला नाही.