तब्बल 39.43 कोटी रुपयांचे आहे पाण्यावर तरंगणारे हे लग्झरी घर

स्वतःचे घर असावे असे प्रत्येक वाटत असते. प्रत्येक जण स्वतःच्या घराला हवे तसे सजवतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा घराबद्दल सांगणार आहोत, जे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. Arkup नावाचे हे लग्झरी यॉट, एक व्हिलाच आहे. 4300 स्केअर फूट जागेच्या यॉटमध्ये एक शानदार घर बनविण्यात आले आहे. हे एक पाण्यावर तरंगणारे घर आहे.

या यॉटमध्ये सर्व सुविधा आहेत. याशिवाय घाण पाण्यापासून ते वादळात देखील या घराला काही होणार नाही. या लग्झरी व्हिला यॉटची किंमत तब्बल 5.5 मिलियन डॉलर (जवळपास 39.43 कोटी रुपये) आहे. या यॉटमध्ये 100kW/272 hp इलेक्ट्रिक इंजिन आहे. हे सोलर पॅनेलवर चालते. त्यामुळे पर्यावरणाला देखील अनुकूल आहे.

(Source)

या व्हिलामध्ये 4 बेडरूम, 1 लिव्हिंग रूम, 1 किचन, 4 बाथरूम आणि एक स्विमिंग प्लॅटफॉर्म आहे. व्हिलाच्या छतावर सोलर प्लेट्स लावण्यात आलेल्या आहेत. यात पावसाचे पाणी देखील स्वच्छ करण्यासाठी एक प्यूरिफिकेशन सिस्टम लावण्यात आलेली आहे. येथे 4000 गॅलन पाणी साचवून ठेवता येऊ शकते. म्हणजेच तुम्ही मोठ्या प्रमाणात येथे जेवणाची व्यवस्था करून ठेवली तर अनेक दिवस येथे राहू शकता.

(Source)

असे असले तरी हा व्हिला चक्रीवादळाला सहन करण्यास सक्षम नाही. त्यामुळे याला केवळ स्थिर पाण्यातच ठेवता येते. हे यॉट पाण्यात 30 फूटापर्यंत वरती उचलू शकते. म्हणजेच तटावर येणाऱ्या लाटांना हे यॉट सहज झेलू शकते.

हे यॉट अधिकत्तर 7 नॉट स्पीड पकडते आणि 20 नॉटिकल माइल्स अंतर पार करू शकते. बॅटरीची क्षमता वाढून याला अधिक चांगले करता येऊ शकते. Arkup ला डिझाईन करणारे निकोलस म्हणाले की, हे यॉटपेक्षा अधिक घर आहे. तुम्ही पाण्यावर तरंगत राहण्याचा अनुभव याद्वारे घेऊ शकता. याला बनविणाऱ्या कंपनीने म्हटले आहे की, ऑर्डर मिळाल्यास या सारखे आणखी घरे तयार केली जातील.

Leave a Comment