Liger Trailer : विजय देवरकोंडाच्या लायगरचा ट्रेलर रिलीज, विजयच्या दमदार अॅक्शनचा कहर


विजय देवरकोंडा स्टारर ‘लायगर’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये अभिनेत्याचा दमदार अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. विजयची शैली ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. या चित्रपटाचा ट्रेलर सर्वप्रथम हैदराबादमध्ये प्रदर्शित करण्यात आला. यादरम्यान तेथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत बनलेल्या या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत.