Ponniyin Selvan : प्रदर्शनापूर्वीच ऐश्वर्या रायच्या चित्रपटाला ग्रहण, या कारणावरून मणिरत्नम यांना पाठवली न्यायालयाने नोटीस


पोन्नियन सेल्वम ही चोल साम्राज्याच्या संघर्षाची कथा आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपटाची कास्ट, कथा आणि ग्राफिक्सचीही बरीच चर्चा आहे. चित्रपटात उत्तम व्हिज्युअल्स आणि इफेक्ट्सचाही वापर करण्यात आला असून हा खूप मोठ्या बजेटचा चित्रपट आहे. पण दिग्दर्शक मणिरत्नमचा पोन्नियन सेल्वम हा चित्रपट रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील मोठी चूक पकडण्यात आली असून, त्यामुळे न्यायालयाने निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. चाहते ऐश्वर्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, पण रिलीज होण्यापूर्वीच त्यावर गदारोळ होताना दिसत आहे.

काय आहे आरोप
हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज असला, तरी न्यायालयाने दिग्दर्शक मणिरत्नम आणि अभिनेता विक्रम यांना नोटीस बजावली आहे. हा चित्रपट भारतावर 1500 वर्षे राज्य करणाऱ्या चोल राजवंशाच्या कथेवर आधारित आहे. निर्मात्यांनी त्याची कथा चुकीची मांडल्याचा आरोप न्यायालयाने केला आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाशी संबंधित ऐतिहासिक तथ्ये तपासण्यासाठी विशेष स्क्रीनिंगची मागणी वकिलाने केली आहे. अॅडव्होकेट सेल्वम म्हणतात की, स्पेशल स्क्रीनिंगद्वारे हे तपासले जाईल की ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड तर केली नाही ना.

मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट
अधिवक्ता सेल्वम यांना शंका आहे की निर्माते राजवंशाबद्दल काहीतरी उघड करू शकतात, ज्याचा वास्तविकतेशी अजिबात संबंध नाही. मणिरत्नमचा हा चित्रपट घोषणेपासून चर्चेत राहिला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या अतिशय सुंदर शैलीत दाखवण्यात आली आहे. चित्रपटाच्या कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर, ऐश्वर्या राय व्यतिरिक्त विक्रम आणि त्रिशा पोन्नयान सेल्वनमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तो या चित्रपटावर बऱ्याच दिवसांपासून काम करत आहे.

बिग बजेट चित्रपट
पोन्नियन सेल्वनबद्दल असे म्हटले जात आहे की हा चित्रपट भारतात बनलेला आतापर्यंतचा बिग बजेट चित्रपट आहे. त्याचे बजेट 500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. मणिरत्न यांनी आपला चित्रपट बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्याने भारताच्या विविध भागात या चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबर 2021 मध्येच संपले होते. हा संपूर्ण भारतातील चित्रपट असून 30 सप्टेंबर रोजी हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.