दक्षिण आफ्रिकेत होणार मिनी आयपीएल

दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षापासून नवी टी २० लीग सुरु होत असून त्याचे वर्णन मिनी आयपीएल असे केले जात आहे. कारण आयपीएलच्याच मुख्य सहा टीमकडून या नव्या टी २० लीगच्या फ्रांचाईजी साठी बोली लावल्या गेल्या आहेत. १३ जुलै रोजी झालेल्या लिलावात २९ गुंतवणूकदारांनी बोली लावली असे समजते.

क्रीकबज मधील माहितीनुअर ६ प्रमुख आयपीएल फ्रांचाईजीनी द. आफ्रिका टी २० लीग टीम घेतल्या आहेत. त्यात मुंबई इंडियनचे मुकेश अंबानी, चेन्नई सुपरकिंग्स एन श्रीनिवासन, दिल्ली कॅपिटलचे पार्थ जिंदाल, संरायझर्स हैद्राबादचे मारन, लखनौ सुपरजायंटचे संजीव गोयंका, व राजस्थान रॉयल्सचे मनोज बडाले यांचा समावेश आहे. क्रिकेट साउथ आफ्रिका यांनी या संदर्भात अजून घोषणा केलेली नसली तरी या सर्व लोकांना त्यांची निवड झाल्याच्या सूचना दिल्या आहेत. या संदर्भातली अधिकृत घोषणा या महिना अखेर होईल असे समजते.

बोली जिंकलेल्या फ्रांचाईजीना शहरे निवडण्याच्या सूचना दिल्या गेल्या असून मुंबई इंडियनने केपटाऊन, चेनेई टीमने जोहांसबर्ग, दिल्ली टीमने सेन्चुरियन बेसची निवड केल्याचे क्रीकबज चे म्हणणे आहे. सर्वाधिक बोली मुंबई इंडियन्स आणि सीएसके ने लावली असून ही बोली २५० कोटींची आहे असेही सांगितले जात आहे. आयपीएल मॉडेल प्रमाणे या स्पर्धा होणार आहेत. अनेक विदेशी गुंतवणूकदारांनी पण या लिलावात बोली लावल्या होत्या पण भारतीयांच्या तुलनेत ते मागे पडले असे समजते.

या टी २० लीग साठी संघांची नवे वेगळी असतील असा खुलासा केला गेला आहे.