वजनावर नियंत्रण ठेवा


जर तुम्ही जाड असाल पण फिट असाल तर तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही, असे नेहमीचं सांगितले जाते, पण एका युरोपियन हॅार्ट जर्नलने याबाबत नुकताच आपलाअहवाल दिला आहे. त्यानुसार एखादी जाड व्यक्ती फिट असली तरी तिला हॅार्ट अॅटक येऊ शकतो. दहा देशातील पाच लाख व्यक्तीच्या अभ्यासानंतर त्यांनी हा अनुमान काढला आहे.

जाड व्यक्ती ज्यांचे ब्लॅड प्रेशर, कोलेस्ट्रॅाल, ब्लड शुगर ही सामान्य असले तरी त्यांना ह्दयाचे विकार होऊ शकतात. अभ्यासकांनी बारा वर्षाच्या अभ्यासानंतर हा अनुमान काढला आहे. यातील 7637 जणांना हदयांचे विकार आहेत. जाड असल्याचा धोका त्यांना आहे. वजन जास्त असलेल्यांना व अपचनाच्या त्रास असलेल्यांना ब्लॅड प्रेशर, कोलेस्ट्रॅाल, ब्लड शुगर असल्याचे या अहवाला नमूद केले आहे.

साम्यानांपेक्षा ह्दय विकार होण्याची शक्यता 28 टक्के अधिक असते. जास्त वजन असणाऱ्यांना रक्तदाब वाढणे, जास्त ग्लुकोज असल्यामुळे धोका होऊ शकतो. यासाठी आपल्या वजनावर निंयत्रण ठेवणे हे सर्वात महत्वाचे असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. वजन जास्त असलेल्या व्यक्ती या आरोग्याने फिट जरी असल्या तरी पुढे त्यांना हॅाट अॅटक येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही मत या अहवालात नोंदविले आहे. त्यामुळे तुम्ही जाड असाल तर आतापासून वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर ह्दय विकारांचे संकट येणार नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment