Sri Lanka Crisis : माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याने मानले भारताचे आभार, म्हणाला – संकटात केली श्रीलंकेला मदत


कोलंबो – श्रीलंकेत सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून जनतेला साथ देणाऱ्या माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याने आपल्या देशाला कठीण काळात मदत केल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. यासोबतच देशात आंदोलन सुरू झाल्याच्या तारखेला म्हणजेच 9 जुलैला जन दिवस (सार्वजनिक दिन) असे संबोधण्यात आले आहे.

ते म्हणाले, या संकटाच्या सुरुवातीपासूनच भारताने आमच्याकडे मदतीचा हात पुढे केला आहे आणि देशाला मानवतावादी मदत पुरवत आहे, त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. देशातील सध्याच्या परिस्थितीवर माजी क्रिकेटपटू म्हणाला, या संकटात भारताची भूमिका महत्त्वाची आहे.

श्रीलंकेतील रस्त्यांवर आणि रस्त्यांवरील निदर्शने सुरुवातीपासूनच शांततापूर्ण आहेत. मी आंदोलकांच्या पाठीशी आहे, पण स्थिर सरकार स्थापनेसाठी लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा. देशात स्थिर सरकार स्थापन झाल्यानंतरही IMF, भारतासह इतर मित्र देश श्रीलंकेला मदत करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या जयसूर्याला राजकीय खेळपट्टीवरील प्रवेशाबद्दल विचारले असता, त्याने राजकारणात येणार नसल्याचे स्पष्टपणे नाकारले.