माहीने वाढदिवशी विम्बल्डन वर लावली हजेरी
टीम इंडियाचा यशस्वी माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी आज ४१ वा वाढदिवस साजरा करत असून धोनीने या दिवशी विम्बल्डन स्पर्धेत हजेरी लावून त्याच्या आवडत्या खेळाडूचा खेळ एन्जॉय केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यावर त्याचा हा दुसरा वाढदिवस आहे. धोनी सध्या परिवारासोबत इंग्लंड मध्ये आहे. इकडे भारतात त्याच्या विजयवाडा येथील चाहत्यांनी धोनीचे ४१ फुटाचे कटआउट लावून त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. पत्नी साक्षी हिने इन्स्टाग्रामवर धोनीचा केक कापतानाचा फोटो शेअर केला आहे.
विम्बल्डन २०२२ च्या स्पर्धेत धोनीने त्याच्या मित्रांसह सामना पाहण्यास हजेरी लावली. चार वेळा चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल चँपियनशिप मिळवून देणाऱ्या धोनीचे फोटो याच फ्रांचाईजीने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. त्यात ग्रे ब्लेझर आणि पांढरा शर्ट घातलेला धोनी दिसत असून त्याच्या शेजारी सुनील गावस्कर सुद्धा दिसत आहेत. राफेल नदाल आणि टेलर फ्रीटज यांच्यातील , पुरुषी एकेरीचा, क्वार्टर फायनलचा हा सामना सेंटर कोर्टवर झाला आणि पाच सेट पर्यंत पोहोचलेला हा रोमांचक सामना राफेल नदाल ने जिंकला. याच सामन्याला प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहाम यानेही हजेरी लावली होती.