ब्रिटन मध्ये जून अखेर करोनाच्या २३ लाख केसेस- डोकेदुखी मुख्य लक्षण
जगभरात विविध देशात करोना पुन्हा एकदा डोके वर काढत आहे मात्र लसीकरण झाल्याने मृत्यूचे प्रमाण कमी आहे. अनेक देशात सर्दी, खोकला ताप अशीच लक्षणे दिसत आहेत. मात्र ब्रिटन मध्ये गेल्या एक आठवड्यात कोविड वेगाने संक्रमण करत असून त्यात प्रामुख्याने डोकेदुखी हे लक्षण महत्वाचे ठरले आहे. महाराणी एलिझाबेथ यांच्या राजसत्तेला ७५ वर्षे झाल्याचे कार्यक्रम पार पडल्यापासून कोविड चे प्रमाण वेगाने वाढले आहे. जूनच्या अखेरी पर्यंत ब्रिटन मध्ये २३ लाख कोविड संक्रमित असल्याचे समोर आले आहे.
कोविड अॅनालेसीस अॅप झेडओई नुसार या संक्रमितांच्या मध्ये डोकेदुखी हे मुख्य लक्षण दिसले आहे. ओएनएसच्या डेटानुसार २०२० च्या उन्हाळ्यात इंग्लंड मध्ये कोविड संक्रमण दर ०.१ टक्क्यापेक्षा कमी होता तो २०२१ मध्ये १.५७ तर २०२२ मध्ये ३.३५ टक्क्यांवर गेला आहे. त्यात ओमिक्रोन बीए.४ आणि बीए.५ व्हेरीयंट चे रुग्ण जास्त आहेत. झेडओई अॅपचा वापर करणाऱ्या दर तीन रुग्णामध्ये दोन जणांना डोकेदुखी त्रास दिसला असून काही जणांना श्वास घेण्याचा त्रास सुरु होण्यापूर्वी डोकेद्खीचा त्रास झाला आहे. हे एक स्टडी अॅप असून प्रो. टीम स्पेक्टर याची निरीक्षणे नोंदवीत आहेत.
यात असेही दिसून आले आहे कि वर्षाच्या सुरवातीला अनेक जणांना संक्रमण झाले ते पुन्हा एकदा संक्रमित झाले आहेत मात्र तीन महिन्याच्या आत पुन्हा संक्रमण होण्याचे प्रकार अगदी दुर्मिळ आहेत.