गुवाहाटी – आसाममधील प्रमुख इस्लामिक संघटना ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’ (एआययूडीएफ) प्रमुख आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांनी मुस्लिमांना बकरी ईदला गायींची कुर्बानी देऊ नये, असे आवाहन केले आहे. 10 जुलै रोजी बकरी ईद साजरी होण्याची शक्यता आहे.
Badruddin Ajmal Appeal : मुस्लिमांनी बकरी ईदला गायीची कुर्बानी देऊ नये, बदरुद्दीन अजमल यांचे मोठे आवाहन
जमियत उलेमा या प्रमुख इस्लामिक संघटनेच्या आसाम युनिटने मुस्लिमांना ईद-उज-अधा किंवा बकरी ईदच्या दिवशी गायींची कुर्बानी न देण्याचे आवाहन केले. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, असे ते म्हणाले. बकरी ईद सणाचा बलिदान हा महत्त्वाचा भाग असल्याने गायीशिवाय इतर प्राण्यांचा बळी दिला जाऊ शकतो, असे संघटनेचे राज्य प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांनी सांगितले.
आसाममधील राजकीय पक्ष ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) चे अध्यक्ष अजमल यांनी एक निवेदन जारी केले की, हिंदूंचा सनातन धर्म गायीला माता मानतो आणि तिची पूजा करतो. आपण त्यांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत. 2008 मध्ये, इस्लामिक सेमिनरी दारुल उलूम देवबंदने जाहीर आवाहन केले की बकरी ईदला गायींची कुर्बानी देऊ नये. गाय बलिदान अनिवार्य नसल्याचे मदरशाने म्हटले होते.
आसाममधील धुबरी येथील खासदार अजमल यांनी सांगितले की, देशातील बहुसंख्य लोकसंख्येच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून बकरी ईदच्या दिवशी गायीऐवजी इतर कोणत्याही प्राण्याचा बळी द्यावा, या आवाहनाचा पुनरुच्चार करत आहोत. ईद-उल-अधा दरम्यान उंट, बकरी, म्हैस आणि मेंढ्या यांसारख्या इतर प्राण्यांचा बळी दिला जाऊ शकतो. देशातील बहुसंख्य लोक गायीला पवित्र मानत असल्याने मी तुम्हाला विनंती करतो की, गायीचा बळी देऊ नका आणि इतर कोणत्याही प्राण्याचा बळी द्या.