एलियन्सनी आणला करोना- किम जोंग उन
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन त्याचे अजब निर्णय आणि विधाने यामुळे नेहमीच चर्चेत असतो. शुक्रवारी त्याने असेच एक विधान केले असून त्यामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. किम जोंग उनच्या म्हणण्यानुसार करोना व्हायरस एलियन्स मुळेच देशात आला आहे. किम असा दावा करतोय की, द. कोरियाच्या सीमेवर एलियन्सनी बलून किंवा फुग्यातुन करोना विषाणू फेकला आणि त्यामुळे उत्तर कोरियात करोना साथ आली आहे.
बीबीसीच्या रिपोर्ट नुसार किम जोंग उनच्या मते त्यांच्या टीमने करोना कुठून देशात शिरला याचा जेव्हा शोध घेतला तेव्हा द. कोरियाच्या सीमेवरून फेकल्या गेलेल्या फुग्यातुन तो आला. हे फुगे फुटले आणि वारा तसेच अन्य जलवायू मुळे करोना विषाणू देशभर फैलावला. त्यामुळे देशातील नागरिकांना अनोळख्या वस्तूंपासून सावध राहण्याचा इशारा दिला गेला आहे.
उत्तर कोरियाची सरकारी मिडिया केसीएनएच्या बातमीनुसार १८ वर्षाचा एक सैनिक एप्रिलच्या सुरवातीला अज्ञात वस्तूच्या संपर्कात आला आणि काही दिवसातच त्याच्यामध्ये करोनाची लक्षणे दिसू लागली. कान्ग्वेन प्रांतातून राजधानी कडे येणाऱ्या लोकांमधून तापाचे संक्रमण झाले आणि या लोकांच्या संपर्कात अन्य नागरीक आल्याने करोना केसेस अतिशय वेगाने वाढल्या.