एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, राज्यपालांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी केली घोषणा


मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. राज्यपालांची भेट घेण्यासाठी दोघेही राजभवनात पोहोचले. एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.

संध्याकाळी 7.30 वाजता एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली. आज संध्याकाळी 7.30 वाजता शपथविधी होणार आहे.