शाहरुखच्या चित्रपटाना ‘मुंह मांगा दाम’ देण्यास ओटीटी प्लॅटफॉर्म तयार

तब्बल पाच वर्षांच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचा जलवा घेऊन शाहरुख खान वापसी करत आहे. त्याचे पठाण, डंकी आणि जवान हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सनसनाटी माजवतील असे अंदाज वर्तविले जाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटांच्या डिजिटल हक्कासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर जबरदस्त स्पर्धा सुरु झाली आहे.

बॉलीवूड लाईफ नुसार अमेझोन प्राईमने पठाण साठी तर नेटफ्लिक्सने जवान साठी मुंह मांगा दाम मोजण्याची तयारी दाखविली आहे. ३० वर्षाच्या आपल्या बॉलीवूड करियर मध्ये शाहरुखने एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र ‘झिरो’ या चित्रपटाने त्यांच्या यशस्वी करियरला ब्रेक लावला कारण हा चित्रपट फ्लॉप ठरला. तेव्हापासून शाहरुखने अभिनयापासून स्वतःला दूर केले होते. आता पाच वर्षांच्या ब्रेक नंतर तो कमबॅक करत आहे.

मिडिया रिपोर्ट नुसार शाहरुखच्या चित्रपटांच्या डिजिटल राईट साठी कोट्यावधींचा डाव लावला जात आहे. अमेझोनने पठाण साठी १५० कोटीची तयारी दाखविली आहे. नेटफ्लिक्सने जवान साठी १७० कोटींची तर डंकी साठी १५० कोटी मोजण्याची तयारी केली आहे. सिनेमागृहात रिलीज झाल्यावर हे चित्रपट ओटीटीवर येतील. पठाणचा पहिला लुक आला असून पोस्टर पाहून चाहते एक्सायटेड आहेत. यात शाहरुख सोबत दीपिका पदुकोन आणि जॉन अब्राहम भूमिका करत आहेत.