कतरिनाच्या भुताचा थरार लवकरच

कतरिना कैफ विक्की कौशल बरोबर विवाहबद्ध झाल्यापासून मोठ्या पडद्यावर फारशी दिसली नसल्याने तिचे चाहते तिच्या दर्शनासाठी उत्सुक झाले आहेत. मात्र कतरिनाचा भूतनी अवतारच त्यांना लवकर पाहायला मिळणार असे दिसते आहे. कतरिनाच्या ‘ फोन भूत’ या आगामी चित्रपटाचा टीझर तिने शेअर केला आहे. या चित्रपटाची चर्चा बरेच दिवस सुरु आहे. कतरिना टीझर खाली कॅप्शन मध्ये लिहिते,’ भयानक कॉमेडी साठी तयार रहा.’

यावरून कतरिना या चित्रपट भूतिणीच्या भूमिकेत दिसेल याचे संकेत दिले गेले आहेत. निर्माता फरहान अख्तर याला हा चित्रपट १५ जुलै २०२२ रोजी रिलीज करायची इच्छा आहे कारण त्याचा गाजलेला, ‘जिंदगी ना मिले दोबारा’ हा चित्रपट १५ जुलै रोजीच रिलीज झाला होता. या चित्रपटात कतरिना सोबत ईशान खट्टर, सिद्धांत चतुर्वेदी लीड रोल मध्ये आहेत. ही एक हॉरर कॉमेडी आहे. गुरमित सिंग यांनी दिग्दर्शन केले असून रितेश रीधवाणी आणि फरहान अख्तर निर्माते आहेत. २०२० पासून या चित्रपटाचे शुटींग सुरु होते असे समजते.