के एल राहुल उपचारासाठी जर्मनीकडे रवाना

टीम इंडियाचा फलंदाज के एल राहुल त्याला झालेल्या इजेवरील उपचारासाठी जर्मनीला रवाना झाला. त्याला पायामध्ये वेदना होत आहेत. आगामी सिरीज मध्ये तो खेळणार कि नाही याबाबत साशंकता आहे. टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून तेथे १ कसोटी, तीन वनडे आणि तीन टी २० असे सामने खेळले जाणार आहेत.

राहुलने स्वतःच इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर करताना उपचारासाठी जर्मनीला रवाना होत असल्याची पोस्ट टाकली असून त्याचे चाहते तो लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना करत आहेत. याच दुखण्यामुळे राहुलला द. आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी २० मालिकेचे कप्तानपद सोडावे लागले होते. राहुल उजव्या हाताचा फलंदाज असून आयपीएल १५ च्या सिझन पासूनच त्याला हे दुखणे त्रास देत आहे मात्र तरीही त्याने लखनौ संघाचे नेतृत्व केले होते असे सांगितले जाते.

राहुल उपचारानिमित्त १ महिना जर्मनीत राहणार आहे. मात्र वेस्ट इंडीज दौरा निवड प्रक्रियेत तो सामील होऊ शकेल असे समजते. बीसीसीआयने राहुल वर जर्मनीत उपचार केले जाणार असल्याची माहिती अगोदरच दिली होती. इंग्लंड दौऱ्यासाठी उपकप्तान म्हणून राहुलची निवड झाली होती, त्या ऐवजी आता ऋषभ पंत याची वर्णी लागली आहे.