Man Tossing Notes : हैदराबादमधील चारमिनारजवळ एका व्यक्तीने हवेत उडवल्या 500 रुपयांच्या नोटा, व्हिडिओ व्हायरल


हैदराबाद – हैदराबादमधील प्रसिद्ध चारमिनारजवळ एका व्यक्तीने 500 रुपयांच्या नोटा हवेत उडवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर ही व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने या व्हिडिओने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

30 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये शहरातील चारमिनारजवळ गुलजार हौज रोडसमोर एक व्यक्ती उभा आहे आणि नोटांचे बंडल हवेत फेकताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शहरातील गुलजार हौज रोडवर अनेक गाड्या थांबल्या आहेत. त्यानंतर चारमिनारवर उभा राहून एक व्यक्ती 500 रुपयांच्या नोटा उडवताना दिसत आहे.

ही व्यक्ती लग्नाचा एक भाग असल्याचे दिसते, कारण तेथे थांबलेली वाहने फुलांनी सजलेली दिसतात. मिरवणुकीत आलेला हा माणूस शेरवानी आणि कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. हा माणूस नोटांचा पाऊस पाडत असताना तिथे उपस्थित असलेले लोक त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत आहेत.


तिथून येणारे-जाणारे हा विचित्र प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते. मीडिया रिपोर्ट्स आणि दर्शकांच्या दाव्यानुसार, त्या व्यक्तीने आपल्या जवळच्या ओळखीच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी नोट्स फेकल्या होत्या.

पैसा-पैसा करती है.. या गाण्यांचे मिश्रण करून हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिस अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. चारमिनारचे निरीक्षक बी गुरु नायडू यांनी माहिती दिली की ते सहभागी लोकांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत आहेत. एक व्यक्ती गाडीतून खाली उतरला, त्याने नोटा फेकल्या आणि निघून गेला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आम्ही घटना केव्हा घडली याची चौकशी करत आहोत. पडताळणीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

वापरकर्ते म्हणाले पैसे वाया घालवू नका
ट्विटरवर शेअर झाल्यानंतर या व्हिडीओवर नेटकऱ्यांची प्रक्रिया सुरू आहे. अनेक यूजर्स त्यावर टीका करत आहेत. एका यूजरने असे पैसे वाया घालवू नका, गरजूंना द्या किंवा अनाथाश्रमाला दान करा असा सल्ला दिला. एकाने आश्चर्याने विचारले की कोणीही पैसे लुटत नाही, खरे की बनावट.

एका युजरने म्हटले की, पैशाचे नुकसान करण्याऐवजी ते गरिबांना दान करा, आपल्या राष्ट्रीय चलनाचा अनादर करुन तुम्ही असे काही चांगले केले नाही की लोकांना तुमचा अभिमान वाटावा. दुसऱ्या एका ट्विटर युजरने टिप्पणी केली की, पैशांचे बेशर्मीने प्रदर्शन. यामुळे अनेक गरजू लोकांना अन्न मिळू शकले असते.