पाकिस्तानात एका झटक्यात 59 रुपयांनी महागले डिझेल, तर 233 रुपयांना विकले जात पेट्रोल


नवी दिल्ली – पाकिस्तानची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत चालली आहे आणि त्यामुळे जनतेचे हाल होत आहेत. आधीच महागलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. एकाच झटक्यात डिझेलच्या दरात 59.61 रुपयांनी, तर पेट्रोलच्या दरातही 24.03 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 233.89 रुपयांवर पोहोचली आहे.

डिझेल 59.16 रुपयांनी वाढले
पेट्रोलसोबतच डिझेल, रॉकेल आणि लाईट डिझेल तेलाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. डिझेलच्या दरात 59.16 रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर डिझेलचा दर 263.31 रुपयांवर पोहोचला आहे.

इम्रान खानने उद्ध्वस्त केली अर्थव्यवस्था : शाहबाज सरकार
पाकिस्तानचे पेट्रोलियम राज्यमंत्री मुसाद मलिक यांनी डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतींबाबत मागील सरकारच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले की, इम्रान सरकारने पाकिस्तानची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. ते पुढे म्हणाले की, इम्रान खान यांनी सबसिडी देऊन जाणूनबुजून पेट्रोलच्या किमती कमी केल्या होत्या आणि त्यामुळेच शाहबाज सरकारला त्या निर्णयांचा फटका बसत आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, मे महिन्यात सरकारला पेट्रोलियम उत्पादनांवर 120 अब्ज रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे, जे नागरिक सरकारच्या खर्चापेक्षा तिप्पट आहे.