दाऊदच्या नावे धमकी, बलात्काराचा आरोप, 2 कोटीही केले नाहीत परत, मुंबईतील 75 वर्षीय व्यावसायिकावर गुन्हा दाखल


मुंबई : मुंबईत एका 75 वर्षीय व्यावसायिकावर बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण मुंबईतील जुहू भागातील आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे 35 वर्षीय पीडितेने सांगितले. पीडित महिलेने आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेने आरोप केला आहे की, तिने व्यावसायिकाला 2 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. वारंवार विनंती करूनही तो पैसे परत करत नव्हता. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, तिने विरोध केला असता आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

डी टोळीकडून आले धमकीचे फोन
पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी व्यावसायिकाने दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आरोपींनी तिला डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकीही दिली होती. दाऊदच्या टोळीकडून तिला धमकीचे फोन आल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.