Pakistan: क्रुरकर्म्यांनी पतीला दोरीने बांधून गरोदर महिलेवर पाच जणांचा


इस्लामाबाद – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून अशी क्रूर बातमी समोर आली आहे, जी वाचून प्रत्येकाची तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडेल. येथे एका गर्भवती महिलेवर पाच जणांनी बलात्कार केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्व आरोपी शस्त्रांनी सज्ज होते आणि त्याच्या बळावर ही घटना घडली. गर्भवती महिलेसोबत असा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर पोलिसांनीही या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब प्रांतातील झेलम शहरात ही घटना घडली. येथे पाच सशस्त्र व्यक्तींनी एका घरात घुसून पती-पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपीने महिलेच्या पतीला दोरीने बांधले आणि नंतर त्याच्यासमोरच महिलेवर बलात्कार केला. पीडित मुलगी एका बाळाला जन्म देणार होती, असे सांगण्यात येत आहे. आरोपीला पकडण्यासाठी तपास सुरू असून महिलेवर वैद्यकीय उपचारही करण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

याआधी चालत्या ट्रेनमध्ये झाला सामूहिक बलात्कार
याआधी पाकिस्तानातच एका महिलेवर चालत्या ट्रेनमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. 25 वर्षीय महिला दोन मुलांची आई होती. मिळालेल्या माहितीनुसार, तिकीट चेकर व्यतिरिक्त आणखी दोन जणांवर बलात्काराचा आरोप आहे. ही ट्रेन कराचीहून मुल्तानला जात होती. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

सहा महिन्यांत 2439 महिलांवर बलात्कार
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात महिलांवरील बलात्काराच्या घटना वाढत आहेत. पंजाब माहिती आयोगाने फेब्रुवारीमध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या सहा महिन्यांत 2,439 महिलांवर बलात्कार आणि 90 जणांची हत्या करण्यात आली आहे. ‘ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2021’ नुसार लैंगिक समानता निर्देशांकात 156 देशांपैकी पाकिस्तान 153 व्या क्रमांकावर आहे.