मुंबई: वाहतूक पोलिसांकडून वारंवार बाईक, सायकल चालवताना हेल्मेटचा वापर करा वारंवार सांगण्यात येते. यासाठी आपल्याकडे कठोर कायदेही करण्यात आले आहेत. कायद्याची आठवण करुन देत रस्त्यारस्त्यावर उभे असलेले ट्रॅफीक पोलीस दंडही ठोठावतात. पण तरी देखील आपल्याला हेल्मेट सोबत न्यायला कंटाळा येतो. जवळच जातो आहे ना, चोरीला जाईल ना, जड आहे खुप, ठेवणार कुठे अशा सबबी आपण देतो. पण आता अशी कोणतीच कारणे तुम्ही देऊ शकत नाही. कारण आता असे एक हेल्मेट आले आहे, जे सोबत ठेवण तुम्ही टाळू शकत नाही. कारण हे हेल्मेट तुम्ही घडी घालून ठेवू शकता.
घडी मारून बॅगेत ठेवा हेल्मेट
अनेकांना हेल्मेट न घातल्याने अपघातादरम्यान आपला जीव गमवावा लागला आहे तर असंख्य जखमी झाले आहेत. अनेक जण हेल्मेट जड आहे अशी तक्रार करतात. आता हीच तक्रार लक्षात घेऊन एक आगळेवेगळे हेल्मेट तयार करण्यात आले आहे. या हेल्मेटची खासियत म्हणजे याचे वजन फारच कमी असल्यामुळे आता हे कुठेही घेऊन जाणे सोपे आहे. त्यामुळे हेल्मेट घालायला कंटाळा करणारेही हे हेल्मेटसोबत असावे म्हणून मागणी करतील एवढे मात्र नक्की.
आपण आतापर्यंत अनेक मोठे हेल्मेट पाहिले असतील पण आता हे फोल्डिंगचे हेल्मेट तयार करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला आता चक्क हेल्मेटची घडी घालता येणार आहे. एवढेच नाही तर हे घडी घातलेले हेल्मेट तुम्ही तुमच्या बॅगेतही ठेऊ शकतात. त्यामुळे भले मोठे, वजनदार हेल्मेट सोबत नेण्याचा त्रासही कमी होईल. हे हेल्मेट तयार करण्यासाठी एक खास तंत्रज्ञान वापरण्यात आल्यामुळे हे हेल्मेट खुप हलक आणि फोल्ड करण्यासारखे आहे. दिवसेंदिवस रस्ते अपघाताच्या घटना वाढत असल्यामुळे हेल्मेटची सक्ती करण्यात यावी असेही अनेकांनी आजवर सुचवले आहे. आता अशाप्रकारचे हेल्मेट आल्याणे बाईक चालक नक्कीच याचा वापर करु शकतील