मासिक पाळीचा टॅबू अद्याप कायमच


‘त्या’ दिवसात नेपाळमध्ये महिलांना काढले जाते घराबाहेर
काठमांडू: स्त्रियांच्या शारीरिक चक्रात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या मासिक पाळीकडे केवळ भारतातच नाही; तर जगातील बहुतेक सर्व देशात एक ‘टॅबू’ म्हणून पहिले जाते. मासिक पाळीबद्दल असलेलय अज्ञानामुळे किंवा परंपराशरण मानसिकतेमुळे पाळीच्या दिवसात महिलांना अस्पृश्य समजले जाते.

आपल्याकडे महिलेला मासिक पाळीच्या दिवसात ‘बाजू’ला बसावे लागते. धार्मिक कार्यात सहभागी होण्यास परवागी नसते. त्याच प्रमाणे नेपाळमध्ये मासिक पाळीच्या काळात नेपाळमधील महिलांना घरापासून दूर एका झोपडीत रहावे लागते. या प्रथेला ‘चौपडी’ म्हटले जाते.

नेपाळमध्ये कायद्यानुसार ही प्रथा बंद करण्यात आली आहे. मात्र अंध:श्रद्धांचा आणि प्रथा- परंपरांचा पगडा यामुळे ही प्रथा अद्याप मोठ्या प्रमाणात पाळली जाते. संसदेत एका नव्या कायद्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून या प्रथेला बेकायदेशीर आणि गुन्हा घोषित करण्याची मागणी केली आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर या प्रथेचं पालन करणा-यांना कारावासाची शिक्षा दिली जाईल.

Leave a Comment