या दिवशी रिलीज होणार बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर


रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. आता निर्मात्यांनी ब्रह्मास्त्रचे प्रमोशन सुरू केले आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि अभिनेता रणबीर कपूर मंगळवारी विशाखापट्टणमला पोहोचले आहेत.

15 जूनला रिलीज होणार ट्रेलर
आता असे कळते की विशाखापट्टणमने एका कार्यक्रमादरम्यान ब्रह्मास्त्रच्या ट्रेलरच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. आलिया आणि रणबीर कपूर अभिनीत चित्रपटाचा ट्रेलर 15 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. अयान मुखर्जीने एक टीझर व्हिडिओ शेअर करून त्याच्या साय-फाय चित्रपट ब्रह्मास्त्रचा ट्रेलर रिलीज करण्याची घोषणा केली आहे. या टीझरमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत अमिताभ बच्चन नागार्जुन यांचीही झलक पाहायला मिळत आहे. तर मौनी रॉय अतिशय क्रूर स्टाईलमध्ये दिसत आहे. या टीझरमध्ये मौनी रॉय आणि रणबीर कपूर यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.


व्हायरल झाला होता विशाखापट्टणमचा व्हिडिओ
त्याचवेळी विशाखापट्टणममधील रणबीर कपूरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये, अभिनेता एसएस राजामौली आणि अयान मुखर्जीसह विशाखापट्टणम विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे, जिथे चाहते त्याच्यावर फुलांचा वर्षाव करतात. पण काही सेकंदातच तिथे उपस्थित असलेला एक चाहता रणबीर कपूरला गुलाब देण्यासाठी गर्दीच्या पुढे जातो, तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी चाहत्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण अभिनेत्यानेही त्या चाहत्याकडून फुल घेऊन अभिवादन केले.

सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट
अयान मुखर्जी दिग्दर्शित या सुपरनॅचरल साय-फाय चित्रपटात रणबीर कपूर सुपर पॉवर शिवाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर आलिया भट्ट ईशाच्या भूमिकेत दिसणार आहे. ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट 09 सप्टेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.