या ठिकाणी बनविली जातात वर्षाला 500 कोटींची भारतीय नाणी

मध्यप्रदेशच्या इंदौर येथील पीथमपूरमध्ये मित्तल एप्लायंस लिमिडेट कंपनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी (आरबीआय) 5 आणि 10 रूपयांची नाणी बनवते. दरवर्षी जवळपास 500 कोटी रूपयांच्या मुल्यांची साडे 5 टन वजनी कोरी नाणी (किंमत व सील आरबीआय नंतर लावते) ही कंपनी बनवते. कंपनीने आतापर्यंत 48 हजार टनांचे 600 कोटी नाणी बनवली आहेत.

हा देशातील सर्वात जूना व सर्वात मोठा प्लांट आहे, जेथे नाणी बनतात. याशिवाय आणखी दोन प्लांट फरीदाबाद आणि हिसार येथे आहेत.

मित्तल एप्लांयस लिमिटेड कंपनीची स्थापन 1986 मध्ये झाली आहे. ही कंपनी 1989 पासून नाणी बनवत असून, 2002 नंतर कंपनी प्रामुख्या नाणी बनवण्याचेच काम करू लागली. कंपनी नौदलाचे मेडल्स देखील बनवते. कंपनीचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अंशुल मित्तल सांगतात की, मेक इन इंडियाला समोर ठेऊन काम करण्यात येत आहे. जेणेकरून बाहेरील देशातून नाण्यांसारख्या गोष्टी मागवाव्या लागू नयेत.

Leave a Comment